कळी गोंजारली, फूल गोंजारले,
कळी विना फूल कुठे गं...
फूल उमलून मिटले तरीही,
गंध त्यातील मनात गं...
पाऊस येतो, पावसाळा मात्र,
पुर्विसारखा नाही गं...
पाऊस केव्हाच गेला तरीही,
डोळे अजुनही ओले गं...
चुकवत वाटा काढतो वाटा,
वाटा तेथे स्थळं गं...
स्थळांच्या वाटा पुसल्या तरीही,
आठवणी मात्र तशाच गं...
पालवी फुटे, तिला देखिल,
तीव्र उन्हाचे शाप गं...
दिवस संपला आता तरीही,
वणवा मात्र तसाच गं...
बसलो आता एकांती मी,
कुणास ठाऊक नाही गं...
दिवसामागून दिवस सरतो,
रात्र अजूनही तशीच गं...
निराशेतही आशा तू मला,
लपवून, लपवली नाही गं...
काळ्या भोर सागराला देखिल,
किनारे धूसर चोहीकडे गं...
-अभि
2 comments:
By the Force!
Great poem, great enough to be a cause of worry. :P
nice! u have a knack for poetry i must say...
Post a Comment