Saturday, March 28, 2009

माझाच मी...


ढग मिटून आलेले पाहतो मी...
त्यातील छेदणारा किरण दिसतो तो त्याला!

दिवसानंतरची रात्र पाहतो मी...
पहाटेचा सूर्योदय दिसतो तो त्याला!

पश्चिमेवर हरवलेले रंग शोधतो मी...
माझ्यातून हरवलेला मी दिसतो तो त्याला!

शेवटी हसतो मन सावरून मी...
आता रडू येतं ते फक्त त्याला!

-अभि

3 comments:

Anonymous said...

ek kaam to karto ek kaam tu,
maafi asavi pan Split persona mhantat yala..

A half light said...

that sort of brings about the beginning of the end of the hidden story in the blog ;)

Arun said...

Wow, we never knew that there is a dormant poet visiting us.Keep writing . All the best.