
अंतरे देखिल थकली आता...
नजर देखिल वळली आता...
खंत कुठेतरी मनात फक्त...
बाकी मन देखिल कोरं आता!
गाव सोडताना मात्र उद्या...
घे बरोबर नक्की सारे...
वस्तू नको अजून आता...
आठवणीच तेवढ्या पुरे!
काळ कधीच थांबत नाही...
वाट कुठलीच सांगत नाही...
भाव कितीही मनात दडले...
खेळ नियतीचे कुणास टळले!
-अभि
No comments:
Post a Comment